• Total Visitor ( 702256 )
News photo

काॅंग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन 

Raju Tapal publisher June 05, 2026 62

काॅंग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन 

      

पुणे :- काॅंग्रेसचे जेष्ठ नेते,माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.

अनंतराव थोपटे यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.उपचार सुरू असतानाच गुरूवारी दि.४ जूनला त्यांची प्राणज्योत मालवली. थोपटे यांचा जन्म ११ जानेवारी १९३३ रोजी झाला होता.काॅंग्रेसचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते.पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसची पक्षसंघटना मजबूत करण्यात थोपटे यांचे महत्वाचे योगदान होते.थोपटे यांनी ६ वेळा भोर मतदार संघातून विजय मिळविला. राज्याच्या मंत्रिमंडळात १४ वर्षे विविध मंत्रीपदाचा जबाबदा-या पार पाडल्या.दुस-यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. अनंतराव थोपटे यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते.सन १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागल्याने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून त्यांचे नाव मागे पडले. दुग्धविकास,पशूसंवर्धन,उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री,परिवहन,पुनर्वसन ,रोजगार हमी योजना मंत्री,संसदीय कार्यमंत्री अशा अनेक मंत्री पदाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते,माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामस्थ विजय ढमढेरे यांनी सांगितले,ब-याच वर्षांपूर्वी भोर शहरातील काॅलेज ग्राऊंडवर काॅंग्रेसचे जेष्ठ नेते,माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या प्रचारार्थ सोनिया गांधी यांची सभा होती.भरपावसात ती सभा झाली होती.सभेस उपस्थित असलेल्या जनसमुदायातील उपस्थितांनी डोक्यावर छत्र्या धरून ती सभा पाहिली,भाषणे ऐकली. "उडाले ते कावळे,राहिले ते मावळे"ही घोषणा त्यावेळी गाजली होती.या सभेस मला उपस्थित राहाण्याचा योग आला होता. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते,माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026