• Total Visitor ( 430778 )

जेष्ठ इतिहास संशोधक,शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे पुण्यात निधन

Raju tapal September 18, 2025 101

जेष्ठ इतिहास संशोधक,शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे पुण्यात निधन 



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- जेष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.

मेहंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला होता. शिवचरित्र,युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. मराठी आणि इंग्रजीमध्ये त्यांनी शिवचरित्रावर महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले असून हे ग्रंथ इतिहास क्षेत्रात जगभर प्रसिद्ध झाले आहेत.

फारसी,मोडी, इंग्रजी ,फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहासातील सत्य,असत्य शोधून काढणे हे आपले ध्येय ते मानत."इस्लामची ओळख", "औरंगजेब" या विषयावर संशोधन व लेखन सध्या ते करत होते असे समजते.

शालेय जीवनापासून इतिहासाची गोडी त्यांना लागली होती. वयाच्या २४ व्या वर्षी ते तरूण भारत चे पत्रकार म्हणून बा़ंगलादेशात गेले.

१९७१ घ्या युद्धकाळात ते बांग्लादेश व पाकिस्तान सीमारेषेवर युद्ध पत्रकार म्हणून हजर राहिले होते.

शिवाजी झाला नसता तर, टिपू अॅज अ‌ वाॅर, शिवाजी : लाईफ अॅंड टाईम, शिवचरित्र,मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

सध्या ते दुस-या महायुद्धावर आधारित सुमारे ५ हजार पानी ग्रंथाच्या लेखनकार्याच्या अंतिम टप्प्यात होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement