• Total Visitor ( 702182 )
News photo

भोर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे यांचे निधन 

Raju tapal July 16, 2025 151

भोर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे यांचे निधन 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- भोर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक ,माजी तालुकाध्यक्ष, दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी भुजंगराव उर्फ आबासाहेब दाभाडे यांचे सोमवारी दि.१४ जुलैला अल्पशा आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी रात्री ११ वाजता निधन झाले.

आबासाहेब दाभाडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भोर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय,कृषी, क्रीडा, व्यापार, उद्योग क्षेत्रावर परखड आणि सडेतोड लिखाण केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीचा प्रभावी वापर केला. निरावाणी साप्ताहिकही त्यांनी सुरू केले होते. मंगळवार दि.१५ जुलैला सकाळी ९ वाजता भोलावडे‌ येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने भोर तालुक्यातील पत्रकारितेचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिका-यांनी व्यक्त केली.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026