• Total Visitor ( 501194 )
News photo

जेष्ठ पत्रकार प्रकाशराव भोईटे यांचे निधन

Raju Tapal publisher April 14, 2026 35

जेष्ठ पत्रकार प्रकाशराव भोईटे यांचे निधन



शिक्रापूर:- पुणे श्रमिक पत्रकार संघाचे,पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार प्रकाशराव ज्ञानेश्वर भोईटे यांचे प्रदीर्घ आजाराने आज सोमवारी निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील ते रहिवासी होते.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा,वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. शिरूर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,दैनिक सकाळचे शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील बातमीदार प्रा.प्रतापराव भोईटे सर यांचे ते मोठे बंधू होते. प्रकाशराव भोईटे यांनी पुढारी,देशदूत,पुण्यनगरी,देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले.सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते.त्यांच्या पार्थिवावर रात्री ९ वाजता कोथळे गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्यात सहभाग घेतला होता.पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक योजना राबविल्या.जिल्हा नियोजन समितीचे ते काही काळ सदस्य होते. शिरूर तालुका पत्रकार संघ पदाधिका-यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. जेष्ठ पत्रकार प्रकाशराव भोईटे यांना श्रद्धांजली वाहताना पुणे जिल्हा मराठी संघाचे माजी सदस्य ,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक,कोंढापुरी येथील पत्रकार विजय ढमढेरे यांनी सांगितले,प्रकाशराव भोईटे सध्या दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते. मी दैनिक केसरी वर्तमानपत्रामध्ये अंदाजे २० वर्षांपूर्वी वाचकांचा पत्रव्यवहार सदरामध्ये पत्रलेखन करत होतो.प्रकाशराव भोईटे यांनी दैनिक पुण्यनगरी वर्तमानपत्रामध्ये प्रदीर्घ काळ वार्तांकन केले. मी ब-याच वर्षांपूर्वी दैनिक पुण्यनगरी वर्तमानपत्रामध्ये शिक्रापूर,कोंढापुरी विभागाचे प्रतिनिधी,पत्रकार म्हणून बातमीदारीचे काम केले आहे. माझ्या आठवणी नुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. प्रकाशराव भोईटे त्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी,मुलाखत घेण्यासाठी पुण्यावरून तळेगाव ढमढेरे या गावी आले होते. दैनिक केसरीचा माजी पत्रलेख,दैनिक पुण्यनगरी वर्तमानपत्राचा माजी वार्ताहर या नात्याने जेष्ठ पत्रकार प्रकाशराव भोईटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement