• Total Visitor ( 429385 )
News photo

जेष्ठ समाजसेवक डाॅ.बाबा आढाव रूग्णालयात दाखल 

Raju tapal December 08, 2025 43

जेष्ठ समाजसेवक डाॅ.बाबा आढाव रूग्णालयात दाखल 

     

शिरूर:- कामगार,कष्टकरी,वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम करणारे ,जेष्ठ समाजसेवक डाॅ.बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील पुना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत असल्याने त्यांच्यावर पुण्यातील पुना हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत असे समजते.

हृदयरोगतज्ज्ञ डाॅ.अभिजित वैद्य यांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णालयात जावून त्यांची भेट घेतली असेही समजते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वैद्यकीय पथकाशी चर्चा करून उपचार प्रक्रियेची माहिती घेतली.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून डाॅ‌.बाबा आढाव यांची ओळख महाराष्ट्रातील जनतेला असून पुण्यातील नाना पेठेत त्यांचे वास्तव्य आहे.कष्टक-यांचे नेते म्हणून त्यांची ओळख असून समता,स्त्रीवाद,जातीय निर्मूलनावर त्यांनी काम केले. हमाल पंचायतीची त्यांनी स्थापना केली.एक गाव एक पाणवठा मोहिमेचे ते जनक असून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केल्याचे समजते. कष्टक-यांचे नेते म्हणून बाबा आढाव यांना ओळखले जात असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगार संघटना, वंचितांच्या हक्कासाठी घालविले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement