• Total Visitor ( 509490 )
News photo

म्हापण ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा..

Raju Tapal publisher May 06, 2026 20

म्हापण ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा..



सरपंच व उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सदस्यांनी दिला राजीनामा



या म्हापण ग्रामपंचायतीमध्ये एकूण ११ सदस्य असून,यापैकी ७ ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने म्हापण गावात खळबळ उडाली आहे.



सिंधुदुर्ग :- म्हापण ग्रामपंचायत येथे मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथिल सरपंच व उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून एकूण ११ सदस्या पैकी ७ ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचे तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामध्ये अविनाश अंकुश खोत खवणे वॉर्ड क्रमांक १,प्राजक्ता प्रवीण सारंग खवणे वॉर्ड क्र.१,सिया सिद्धेश मार्गी,मळई वॉर्ड क्र.२, सुषमा सुधाकर म्हापणकर म्हापण,वॉर्ड क्रमांक ३,प्रशांती प्रशांत कोनकर म्हापण वॉर्ड क्रमांक ३,गुरुप्रसाद भगवान चव्हाण म्हापण वॉर्ड क्रमांक १,अभय(बापू) गंगाधर ठाकूर म्हापण या सात ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या सदस्य पदाचा लेखी राजीनामा म्हापण सरपंच यांच्या कडे सादर करत आपल्या सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. सदर सदस्य यांच्या मते अद्याप पर्यंत झालेल्या कार्यकाळात असे निदर्शनास आले आहे की,म्हापण सरपंच व उपसरपंच मनमानी कारभार करत असून कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला विचारात न घेता मासिक सभेत योग्य तो ठराव न घेता स्वतः निर्णय घेऊन चुकीच्या पद्धतीने कामकाज करत असून स्वतःची मनमानी व अरेरावी करून ग्रामपंचायत मध्ये बेकायदेशीर व अनधिकृत कामे होत असून सरपंच व उपसरपंच यांच्या या मनमानी कारभार कंटाळून आपल्या पदाचे राजीनामे देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement