शाळा महाविद्यालय व कोचिंग कलास सुरू करा
Raju Tapal
January 20, 2022
33
शाळा महाविद्यालय व कोचिंग कलास सुरू करा,भाजपा शिक्षक आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन,,
यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस अजुन महात्रे,महिला जिल्हा अधयक्षा रेखा चौधरी, शहर अध्यक्ष प्रेमनाथ महात्रे मिरार देसाई, संजीव भिवाडकर,भाजप कोकण विभाग शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, किशोर पाटील, दिनेश भामरे, विनोद शेलकर,सुभाष सरोदे, प्रविण सनेट, दिपक रजपूत, आदी उपस्थित होते,
कोरोना आजाराने देशात थैमान घातले होते, त्या मुळे शासनाने जवळपास दोन वषै पासून शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, मध्यातरी कोरोना आजार कमी झालेल्याने कोरोनाचे नियम पाळून शाळा व महाविद्यालय सुरू केली होती, परंतु पुन्हा कोरोना आजारात वाढ झालेल्याने शासनाने शाळा व काँलेज बंद केले व पुन्हा आँनलाईन शिक्षण सुरू केले,
परंतु आँनलाईन शिक्षण सवैसामान्य गोरगरीब विधाथी तसेच दुगैम अतिदुर्गम खेडया पाडयात आँनलाईन शिक्षण पोहचत नाही, त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक दरी वाढून सवैसामान्यांची मुले शिक्षणाच्च्या मुख्य प्रवाहा पासून दूर राहतील, यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालय सुरू करावे ,
भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की सवै राज्यभर भाजपा शिक्षक आघाडी कडून जिल्हा अधिकारी, शिक्षण अधिकारी, तहसीलदार यांना शाळा, महाविद्यालयात, कोचिंग व्लास सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे, रेल्वे, हाँटोल, बार,दुकाने, वाहतूक, माँल हे सवैच सुरू आहेत, तर मग शाळा महाविद्यालय का नाही सुरू, शाळा महाविद्यालयात कोरोना शिरतो का,दोन वषै पासून शाळा बंद आसल्लामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे, कागदावर किती दिवस पास करणार, एक मंत्री बोलतो शाळा सुरु करणार तर दुसरा मंत्री महणतो,शाळा बंद राहतील, याचा अर्थ ठाकरे सरकार शिक्षणातही राजकारण करीत आहे, शासनाने जरी 26,जानेवारी पुरवी शाळा महाविद्यालयात कोचिंग व्लास सुरू नाही केल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल,
Share This