• Total Visitor ( 429498 )
News photo

शिक्रापूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधी प्रदान 

Raju tapal October 19, 2025 239

शिक्रापूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधी प्रदान 

         

शिक्रापूर ( प्रतिनिधी):- सर्वांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक १६/१०/२०२५ रोजी दिव्यांग बांधवांची शिक्रापूर ग्रामपंचायत मध्ये मीटिंग आयोजित केली होती.

दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे त्यांना संधी दिल्यास ते त्यांच्या क्षमतेचा पूर्णपणे योग्य वापर करून समाजात मोलाचे योगदान देऊ शकतात त्यांच्यासाठी सहानुभूती आणि समर्पणाने काम करत आपण त्यांना सक्षम बनवू शकतो. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मान आणि मदतीची गरज असते जेणेकरून तेही आपल्यासारखे स्वतंत्रपणे जगू शकतील म्हणूनच शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या वतीने शिक्रापूर गावातील सर्व दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणूनच त्यांच्या हक्काचा दिव्यांग निधी जवळजवळ सात लाख रुपये चेक स्वरूपात त्यांना देण्यात आल्याचे शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे‌ यांनी सांगितले. आपलेही समाजाप्रती काहीतरी देणे लागत असल्याने सर्व दिव्यांग बांधवांनी एक मुखाने आपल्या पाच टक्के दिव्यांग निधीमधून अडीच टक्के दिव्यांग निधी हा शिक्रापूर येथील ग्रामपंचायत इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यासाठी खर्च करण्यात यावा असा एक अनोखा निर्णय यावेळी घेतला. तसेच शिक्रापूर आणि शिक्रापूर परिसरात आरोग्याचे कुठलेही संकट आले तरी शिक्रापूर मधील सर्व आशा सेविका  नेहमीच योग्य चांगल्या रीतीने व्यवस्थापन करून येणाऱ्या सर्व संकटाला सामोरे जाऊन गावावर येणारे सर्व संकट मार्गी लावत असतात त्यामुळे ग्रामपंचायतचे एक कर्तव्य म्हणून आशा सेविकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना सुद्धा साड्या व मिठाई देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाची कोणतीही योजना असो किंवा कोणताही सर्वे असो शिक्रापूर गावातील सर्व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस त्यांचे काम अगदी चोख बजावतात. तसेच मुलांना शिक्षण व आहार देण्याचा समतोल राखतात. योग्य रितीने मुले घडवतात त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचीही दिवाळी गोड व्हावी म्हणून साडी व मिठाई देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्रापूर मधील सर्व बालवाडी सेविका मदतनीस यांनाही साडी व मिठाई देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर आशा सेविका,अंगणवाडी सेविका,बालवाडी सेविका यांनीही आपल्या भावना व्यक्त गेल्या. शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे,उपसरपंच वंदनाताई भुजबळ,पूजाताई भुजबळ,उषाताई राऊत,सारिकाताई सासवडे,शालनताई राऊत,मोहिनीताई  युवराज मांढरे,मोहिनीताई मांढरे सीमाताई लांडे,सुभाष खैरे,मयूर करंजे,त्रिनयन कळमकर,प्रकाश वाबळे,कृष्णा सासवडे,विशाल खरपुडे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांनी सूत्रसंचलन केले सरपंच रमेशराव गडदे‌,पूजाताई भुजबळ,सुभाष खैरे उषाताई राऊत मोहिनीताई मांढरे  उपसरपंच वंदनाताई भुजबळ,यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले .ग्रामविकास अधिकारी नंदकुमार वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.

              


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement