• Total Visitor ( 84857 )

शिवजंयती निम्मित्ताने गरजु रुणांना व अनाथांना फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न !

Raju Tapal February 19, 2022 55

शिवजंयती निम्मित्ताने गरजु रुणांना व अनाथांना फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न !

शुक्रवार, दि.१८ फेब्रुवारी २०२२ रोजी  महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय, गोवेली ता.कल्याण येथील रूग्णांना व बेघर अनाथ लहान मुलांना फळवाटप कार्यक्रम संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम श्री चेतनसिंह पवार (जिल्हाध्यक्ष- शिवजयंती महोत्सव समिती, ठाणे जिल्हा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी श्री अनंता सुरोशी(सामाजिक कार्यकर्ते), श्री गणेश चोरगे (सदस्य रूग्णालय कमिटी गोवेली), श्री जगदीश धुमाळ (मा. सरपंच), श्री दिनेश सासे (प्रदेश सहसचिव ओबीसी), श्री अमोल सुरोशी (तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस, कल्याण तालुका) श्री योगेश्वर बुटेरे (सामाजिक कार्यकर्ते) डॉ. उज्ज्वलसिंह जाधव व हाॅस्पिटल स्टाफ तसेच बेघर वसतिगृह म्हस्कल अधीक्षक श्री सौरभ महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement