• Total Visitor ( 548639 )
News photo

शिवसंवाद दौरा-आष्टी आणि गेवराई विधानसभा आढावा बैठक

Raju Tapal publisher May 29, 2026 20

शिवसंवाद दौरा-आष्टी आणि गेवराई विधानसभा आढावा बैठक



मराठवाड्यात सुरू असलेल्या ‘शिवसंवाद दौऱ्या’च्या आजच्या दुसऱ्या टप्प्यात आष्टी आणि गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पदाधिकारी,युवासेना,महिला आघाडी तसेच स्थानिक शिवसैनिकांसोबत उत्साहपूर्ण आणि सखोल आढावा बैठका संपन्न झाल्या. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटी,बूथनिहाय नियोजन,गावपातळीवरील पक्षविस्तार आणि जनसंपर्क मोहिमेच्या कामांचा यावेळी विस्तृत आढावा घेण्यात आला. शिवसेनेची विचारधारा आणि पक्षाची भूमिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय राहून नागरिकांशी सातत्याने संवाद साधावा,असे आवाहन यावेळी केले. शेतकरी,युवक,महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या (SIR) अनुषंगाने प्रत्येक बूथवर संघटना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. नवीन मतदार नोंदणी,मतदार यादी पडताळणी,बोगस नावे कमी करणे तसेच बीएलए,शाखाप्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने बूथस्तरावर काम करावे,असे निर्देश दिले. यावेळी मंत्री भरत गोगावले,खासदार संदीपान भुमरे,शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी,संपर्क प्रमुख मनोज शिंदे,माजी खासदार आनंद परांजपे,युवासेनेचे अभिमन्यू खोतकर,रुपेश कदम यांच्यासह स्थानिक जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,विभागप्रमूख, शाखाप्रमुख,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement