• Total Visitor ( 449600 )
News photo

शिवसेनेची वचनपूर्ती पॅनल क्रमांक चार मध्ये विकास कामांचा शुभारंभ

Raju tapal December 08, 2025 107

शिवसेनेची वचनपूर्ती पॅनल क्रमांक चार मध्ये विकास कामांचा शुभारंभ



माजी नगरसेविका नमिता मयुर पाटील यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कडे पाठपुरावा करून बल्याणी व मोहीली गावांच्या विकास कामांसाठी तब्बल दिड कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. उपस्थित पाहुणे याच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मयुर पाटील,माजी नगरसेविका नमिता पाटील,युवा सेनेचे सरचिटणीस वैभव भोईर,उपशहप्रमुख अंकुश जोगदंड,उद्योगपती रवि पाटील,राजु पाटील,शाखा प्रमुख शिवाजी गोंधळे,महेश पाटील,रोहन कोट,राजेश पाटील,अराफत गुजर,सुरज पावशे,राम तरे,बाबु कांबळे,अशोक म्हात्रे,सचिन गायकवाड यांच्या सह आदि उपस्थित होते. बल्याणी येथील पाटील आळी ते भगत आळी पर्यंत गटार व पायवाटा बनविणे,तसेच बल्याणी येथील बौद्ध विहार परिसरात गटार व पायवाटा तयार करणे,तसेच मोहीली गाव परिसरात गटारे व पायवाटा बनविणे,तसेच तिप्पना नगर येथील शाळेपासून ते पाण्याच्या टाकी पर्यंत रस्ता तयार करणे इत्यादी कामांसाठी दिड कोटी रुपये निधी मंजूर करुन घेतला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement