• Total Visitor ( 351372 )
News photo

गोंदियात शिवशाही बस उलटून 9 प्रवाशांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

Raju tapal November 29, 2024 83

गोंदियात शिवशाही बस उलटून 9 प्रवाशांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी



महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शुक्रवारी (29 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा गावात गोंदिया कुमार राज्य महामार्गावरील नाल्याजवळ घडली. घटनास्थळावर नागरिक आणि पोलीस पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे.



या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले, "अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे."



देवेंद्र फडणवीसांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत."



"या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले, तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो," असंही फडणवीसांनी नमूद केलं.



आतापर्यंत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 जखमी असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली.



अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत - मुख्यमंत्री शिंदे



गोंदिया जिल्ह्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.



मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशीही सूचना त्यांनी दिली.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement