• Total Visitor ( 640134 )
News photo

श्री मोहन ओमासे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान

Raju Tapal publisher May 13, 2026 88

श्री मोहन ओमासे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान

       

शिरूर:- ​तळेगाव ढमढेरे  येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेचे उपक्रमशील पर्यवेक्षक मोहन ओमासे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 नुकताच शिर्डी येथे प्रदान करण्यात आला. हा सन्मान सोहळा दिनांक 12 मे 2026 रोजी साईबाबा सांस्कृतिक भवन,शिर्डी येथे संपन्न झाला.  प्रमुख पाहुण्या मराठी सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले, . प्रसिद्ध कवी रोहित शिंगे व  प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला . या प्रसंगी श्री. दीपक चामे, राज्य अध्यक्ष,शिक्षक फाउंडेशन,पंकज पालिवाल,राज्य उपाध्यक्ष,महाराष्ट्र शिक्षक पॅनल उपस्थित होते.महाराष्ट्रातील 200 उपक्रमशील शिक्षकांना हा राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे,प्राचार्य अशोकराव दहिफळे,उपप्राचार्या सुनिता पिंगळे यांनी ओमासे सर यांचे पुरस्काराबद्दलअभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या.

  


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement