• Total Visitor ( 704554 )
News photo

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा कल्याण पश्चिम येथे भव्य सत्संग मेळावा.

Raju Tapal publisher May 01, 2026 53

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा कल्याण पश्चिम येथे भव्य सत्संग मेळावा.



दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गाचा नेत्रदीपक भव्य सत्संग मेळावा रविवार दिनांक 3 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परदेशी कंपाउंड,मोहिंदर सिंग काबुलसिंग रोड,कल्याण पश्चिम येथे होणार आहे. गुरुपुत्र, क्रांतीदूत,लाखो तरुणांचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या आगमन कल्याण नगरीत रविवारी होत आहे. श्री स्वामी समर्थ मार्ग विषयीची माहिती,स्वामी सेवेची माहिती, गुरुचरित्र,नवनाथ पारायण,स्वामी चरित्र विषयक आध्यात्मिक सिंचन या निमित्ताने कल्याण मध्ये होणार आहे. आदरणीय चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या जाहीर हितगुजातून केवळ आध्यात्मिकच नव्हे तर आरोग्यविषयक देखील माहिती सर्वसामान्य सेवेकर्‍यांपर्यंत पोहोचणार आहे. 20 टक्के अध्यात्म आणि 80% समाजकारण या उक्तीप्रमाणे दिंडोरी प्रणित मार्गाची वाटचाल याविषयी देखील मार्गदर्शन होणार आहे. आयुर्वेद,आध्यात्म,वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र,मानवाच्या विविध समस्या इत्यादी सर्व माहिती या सत्संग सोहळ्यामधून सर्व स्वामी भक्तांना मिळणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर,वस्त्र दान असे सामाजिक उपक्रम देखील होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व स्वामीभक्त भाविक व सेवेकऱ्यांना या मेळाव्यासाठी जाहीर आमंत्रण देण्यात आलेले आहे.  हजारोंच्या संख्येने या मेळाव्यामध्ये स्वामीभक्त,सेवेकरी सहभाग घेणार आहेत कल्याण पश्चिम मधील सेवा केंद्र मिळून नियोजन करत आहेत. सत्संग सोहळ्यानंतर प्रसाद वाटप देखील असणार आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026