• Total Visitor ( 482011 )
News photo

सिंधुदुर्गच्या जंगलात नेपाळी युवकाचा सांगाडा आढळला

Raju tapal June 28, 2025 85

सिंधुदुर्गच्या जंगलात नेपाळी युवकाचा सांगाडा आढळला;

बॅगेतील मोबाईल अन् घड्याळावरुन गुढ उकललं 



सिंधुदुर्ग:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जंगलात एका विदेशी तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच मालवणच्या नांदोस गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, हा सांगाडा एका नेपाळी तरुणाचा असल्याचं सांगितलं जात आहे. या सांगाड्याजवळ पोलिसांना घड्याळ, बॅग आणि मोबाईल सापडला आहे. या साहित्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, हा तरुण नेपाळी असल्याचं समोर आलं असून तो कट्टा येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता, अशी माहितीही समोर आली आहे.



सांगाड्याजवळ पडलेल्या वस्तुंच्या आधारे मयत तरुणाच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली आहे. आता हा तरुण मालवणच्या जंगलात कसा पोहोचला, त्याच्यासोबत नक्की काय घडलं? त्याने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला? याची कसलीही माहिती पोलिसांकडे नाही. सध्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पोलिसांकडून पुरावे गोळा केले जात आहेत. घटनेचा पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement