• Total Visitor ( 428950 )
News photo

समोरून येणाऱ्या दुधाच्या टॅंकरला‌ छोट्या टेम्पोची धडक ; एकाचा मृत्यू

Raju tapal November 21, 2025 67

समोरून येणाऱ्या दुधाच्या टॅंकरला‌ छोट्या टेम्पोची धडक ; एकाचा मृत्यू

शिरूर:- 

समोरून येणाऱ्या दुधाच्या टॅंकरला भाजीपाला वाहतूक करणा-या टेम्पोची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पुलाजवळ घडली.कमल आबासाहेब टुले‌ वय -४६ असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाजीपाला व्यावसायिक महिलेचे नाव असून आबासाहेब टुले‌ वय -५२ वर्षे,चालक देविदास टुले‌ वय -२८ वर्षे रा‌.एकेरीवाडी‌ ता‌.दौंड अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,गुरूवार दि.२० नोव्हेंबरला पारगाव येथील आठवडे बाजार होता. टुले‌  कुटूंबाने रात्री शिरूर येथून भाजीपाला खरेदी करून सकाळी पारगावकडे प्रवास करत असताना सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान भीमा नदीचा पूल ओलांडल्यानंतर समोरून येणाऱ्या टॅंकरला टुले‌ कुटूंबिय  प्रवास करत असलेल्या भाजीपाला वाहतूक करणा-या छोट्या टेम्पोची धडक बसली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement