• Total Visitor ( 392571 )
News photo

भरधाव कारची दुचाकीला धडक;डाॅक्टरचा मृत्यू 

Raju tapal February 12, 2026 20

भरधाव कारची दुचाकीला धडक;डाॅक्टरचा मृत्यू 

        

शिक्रापूर:-  भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत डाॅक्टरचा मृत्यू झाल्याची घटना रांजणगाव गणपती येथील हाॅटेल अमर इनजवळ पुणे -अहिल्यानगर महामार्गावर घडली. डाॅ.श्रीकृष्ण विष्णू कांदे वय -२६ रा‌.रांजणगाव गणपती असे अपघातात मृत्यु झालेल्या डाॅक्टरांचे नाव असून या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,डाॅ. श्रीकृष्ण कांदे व डाॅ.श्रीकांत बाजीराव शिवले वय -३४ रा‌.नवी सांगवी,पिंपरी हे दोघे एम एच ०२ सी वाय ०७२६ या दुचाकीवरून अहिल्या नगरच्या दिशेने जात होते.हाॅटेल अमर इनजवळ वळण घेत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच १२ वाय  डी ३९३६ या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळील रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान श्रीकृष्ण कांदे यांचा मृत्यू झाला. डाॅ.सौरभ भालचंद्र लोणकर यांनी अपघाताबाबत फिर्याद दिली. कारचालक विद्यानंद सदाशिव राऊत रा. लोणीकंद ता‌.हवेली याच्याविरूद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक मारूती पासलकर अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement