• Total Visitor ( 430389 )
News photo

उन्हाळी सुट्टीत टिटवाळ्यात स्विमिंग प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Raju tapal May 07, 2025 60

उन्हाळी सुट्टीत टिटवाळ्यात स्विमिंग प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन’च्या उपक्रमास पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद



टिटवाळा, प्रतिनिधी –

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या स्विमिंग क्रीडाप्रकाराला आता टिटवाळ्यात ‘विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन’च्या माध्यमातून स्पर्धात्मक आणि आनंददायी प्रशिक्षणाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.



पालकांसाठी सर्वात मोठी चिंता ही मुलांचा वाढता स्क्रीन टाइम आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या ही असते. यावर उपाय म्हणून शारीरिक सक्रियता वाढवणाऱ्या खेळांकडे मुलांचा ओढा वाढवणे आवश्यक आहे. हेच लक्षात घेऊन श्री. विनायक कोळी – राज्य युवा पुरस्कार विजेते व प्रमुख प्रशिक्षक – यांच्या नेतृत्वाखाली हे विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे.



स्विमिंग शिबिराची वैशिष्ट्ये:



स्थान: टिटवाळा



उमेदवार वयोगट: 3 वर्षांपासून सर्व वयोगटातील विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमी



प्रशिक्षण प्रकार: स्पर्धात्मक तंत्रासह सुरक्षेची विशेष काळजी घेणारे प्रशिक्षण



प्रशिक्षक मंडळी:



विनायक कोळी – मुख्य प्रशिक्षक



सिद्धी गायकवाड – महिला प्रशिक्षक



आजपर्यंत या उपक्रमात ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, पालकांमध्ये याविषयी प्रचंड उत्साह आहे. फक्त स्विमिंगच नव्हे, तर टिटवाळ्यात ‘विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन’च्या माध्यमातून कराटे, बॉक्सिंग, स्केटिंग, आर्चरी आणि योगा यांसारख्या विविध खेळांचे नियमित प्रशिक्षण दिले जात आहे.



या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा:

विनायक कोळी – 9137740725

सिद्धी गायकवाड – 9321897073



शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शिस्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या अशा प्रशिक्षण उपक्रमांतून मुलांना सकारात्मक व्यासपीठ मिळत असून, पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विनायक कोळी सर यांनी केले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement