गुजर प्रशालेत क्रीडा दिन उत्साहात संपन्न
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हा दिवस भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे प्रशालेचे क्रीडाशिक्षक राजेंद्र भगत,गोरक्षनाथ वाळके प्रशालेचे सर्व क्रीडा शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी यासाठी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल व रस्सीखेच सारख्या स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
क्रीडा दिनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी कौतुक केले व स्पर्धांना शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.