• Total Visitor ( 449558 )
News photo

विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण,रौप्य व कांस्य पदके 

Raju tapal October 14, 2025 92

विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण,रौप्य व कांस्य पदके 





टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महानगर पालिका जिल्हा आंतर शालेय स्पर्धेमध्ये छत्रपती शिक्षण मंडळाच्या विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेतील विध्यार्थ्यानी कराटे या खेळा मध्ये आपला सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये प्रामुख्याने इयत्ता दहावी ब या वर्गाचा विद्यार्थी कुमार बुद्धप्रेमी जितेंद्र पवार या विद्यार्थ्याने कराटे प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तो पात्र ठरलेला आहे. तर इयत्ता दहावी इ या वर्गाचा विद्यार्थी कुमार प्रणील साबळे या विद्यार्थ्याने कराटे प्रकारात रौप्यपदक पटकाविले आहे आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तो पात्र ठरलेला आहे. आणखी इयत्ता आठवी अ या वर्गाचा विद्यार्थी कुमार वैशम वैभव वाघचौडे या विद्यार्थ्याने कराटे प्रकारात कांस्यपदक पटकाविले आहे. सदरील सर्व विध्यार्थ्यांना महेंद्र पवार सर यांनी प्रशिक्षण दिले. सदरील विद्यार्थ्यांना विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक आणि पालक या सर्वांतर्फे  पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement