• Total Visitor ( 435932 )
News photo

शिरूर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत         

Raju tapal June 18, 2025 88

शिरूर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत         



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील विविध गावांतील शाळांमध्ये चैतन्यमय,उत्साहवर्धक वातावरणात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यूज इंग्लिश स्कूल विद्यालयात ढोल ताशाच्या‌ गजरात,गुलाबपुष्प देवून औक्षण करत टाळ्यांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

सरपंच स्वप्निल गिरमकर,भाऊसाहेब कोकडे,मुख्याध्यापिका बी.बी.दौंडकर,के.डी.मिसाळ,भीमराव कुदळे,कैलास खंडागळे,प्रकाश आफळे यांच्या उपस्थितीत इयत्ता ५ वी ते ८ वीच्या‌ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

सातकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख रामदास विश्वास,मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव यांच्या उपस्थितीत सुरेश सातकर यांनी लेखन साहित्य,पेन,पेन्सिल,खोडरबर‌,वह्या इ‌.साहित्य दिले.तसेच रणजित सातकर यांनी शाळेसाठी दोन ब्लॅक बोर्ड दिले.

तसेच न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जून माध्यमिक विद्यालय,जातेगाव बुद्रुक येथील श्री.संभाजीराजे विद्यालय, विठ्ठलवाडी येथील श्री.पांडूरंग विद्यामंदिर, निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयातही नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.



प्रतिनिधी :- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement