• Total Visitor ( 701404 )
News photo

गोवेली येथे तालुकास्तरीय महाआरोग्य शिबीर संपन्न

Raju Tapal publisher March 25, 2026 118

गोवेली येथे तालुकास्तरीय महाआरोग्य शिबीर संपन्न



टिटवाळा :- महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव यांच्या सक्रिय सहभागातून गोवेली येथे तालुकास्तरीय महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरामध्ये बालरोग,स्त्री रोग,त्वचा रोग, हृदयरोग, डोळयाचे आजार,कॅन्सर तपासणी,दंत तपासणी,पोटाचे विकार,आदि आजारांवर मोफत तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने करण्यात आली.असंख्य नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. यावेळी शिबीराला भेट देण्यासाठी नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी,गोवेली महाविद्यालयाचे प्राचार्य वाघ,उपप्राचार्य सोष्टे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशा मुजाळ,गोवेली आरोग्य केंद्राच्या अधिक्षक डॉ.दिपलक्ष्मी मेश्राम,दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पुनम जयकर,डॉ. भावना राठोड,कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे,गोरक्षनाथ बांधणे यांच्या सह आदिनी भेट दिली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026