• Total Visitor ( 429303 )
News photo

टॅंकरची दुचाकीला धडक; दोघा युवकांचा मृत्यू             

Raju tapal July 23, 2025 62

टॅंकरची दुचाकीला धडक; दोघा युवकांचा मृत्यू             



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- विरूद्ध दिशेने येणा-या टॅंकरने  दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सासवड - नारायणपूर रस्त्यावरील भिवडीनजिक मंगळवारी दि.२२ जुलैला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपूर्वा रविंद्र कुंभारकर वय - २३ कुंभारवळण ,नंदू रत्नाकर होले वय - २२ खानवडी अशी दोघा मृतांची नावे आहेत.

अपूर्वा व नंदू हे दोघे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास होंडा अॅक्टिव्हा एम एच १२ एक्स व्ही ९४४२ वरून सासवडहून नारायणपूरकडे निघाले होते.त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणा-या एम एच १२ आर एन ६८४३ क्रमांकाच्या टॅंकरने दुचाकीला समोरून धडक दिली.या अपघातात नंदू व अपूर्वा टॅंकरखाली सापडून जागीच मयत झाले.

सुमित रत्नाकर होले वय -२७ रा‌.खानवडी याने अपघाताची फिर्याद सासवड पोलीस स्टेशनमध्ये दिली.

टॅंकरचालक हरिभाऊ भिवा टोणे रा‌.लोणीकाळभोर ता‌.हवेली याच्याविरूद्ध सासवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

          


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement