• Total Visitor ( 502123 )

ताठे स्टाफिंगमध्ये संविधान दिनानिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन

Raju tapal November 27, 2025 54

ताठे स्टाफिंगमध्ये संविधान दिनानिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन



प्रो. दिनेश गुप्ता यांचे उत्साहवर्धक व जादुई संबोधन हॉस्पिटल व वैद्यकीय संस्थांना स्टाफ रिक्रूटमेंट सेवा पुरवणाऱ्या ताठे स्टाफिंग तर्फे आज संविधान दिन मोठ्या उत्साहात व सन्मानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात प्रेरक वक्ते व माइंडसेट गुरु प्रो. दिनेश गुप्ता यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मान दिला. ताठे स्टाफिंगचे संचालक. सुधीर ताठे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. उपस्थित कर्मचारी,प्रशिक्षार्थी आणि आमंत्रित पाहुण्यांना संबोधित करताना प्रो. गुप्ता यांनी भारतीय संविधानातील वैशिष्ट्ये,त्याची मूळ तत्त्वे आणि प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्यांची महत्त्वपूर्ण माहिती जादुई आणि प्रेरणादायी शैलीत मांडली. ते म्हणाले की संविधान हे केवळ एक लिखित दस्तावेज नसून प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे,संधींचे आणि जबाबदाऱ्यांचे जिवंत प्रतिक आहे. युवा वर्गाने आपल्या आचार,विचार आणि चारित्र्याच्या बळावर देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सुधीर ताठे यांनी प्रो. दिनेश गुप्ता यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की,अशा प्रेरणादायी सत्रांमुळे कर्मचार्‍यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्ये अधिक दृढ होतात. संविधान दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी ज्ञानवर्धक,प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement