नशा मुक्त भारत अभियान (NMBA) अंतर्गत शालेय स्तरावर अमली पदार्थाच्या वापराविरोधी जनजागृती साठी उपाययोजना करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश
शिक्षक देणार नशा मुक्तीचे धडे
विविध उपक्रमाने आणि आॅनलाईन लिंक भरण्याला शिक्षक कंटाळे
अमरावती :- भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने नशा मुक्त भारत अभियान (NMBA) अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाच्या वापराविरोधी जनजागृती करण्यासाठी विविध उपाय योजना हाती घेण्याबाबत निर्देश दिले आहे. अमली पदार्थाचे सेवन आणि तस्करीवर उपाय म्हणून शालेय स्तरावर व्यापक जागरूकता कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्यामार्फत त्वरित कार्यवाही करण्यात यावी.अश्या प्रकारचे आदेश डायट अमरावती आणि प्राथमिक,माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्हातील गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.शिक्षकांनी नश्या मुक्तीचे धडे शिक्षकांना विद्यार्थांना दयावे लागणार आहे.विविध उपक्रमाने व त्याची लिंक भरण्याला आता मुख्याध्यापक,शिक्षक कंटाळे असुन अश्या उपक्रमावर शिक्षक,मुख्याध्यापक बहीष्कार टाकण्याच्या तयारीत आहे.महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांकडे शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती याचा शासन आदेशच काढले आहे.
शालेय स्तरावर अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविणे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्या अंतर्गत विविध कार्यक्रम शाळांमध्ये राबविण्यात यावे
असे आदेश दिले आहे.
शाळेत विशेष चर्चा सत्र व कार्यशाळा शाळांमध्ये तज्ञ व्यक्ती आणि डॉक्टर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करावी. प्रभावीत द्रुक श्राव्य साधने अमली पदार्थाचे दुष्परिणाम स्पष्ट करणारे व्हिडिओ, पोस्टर, पावर पॉइंट सादरीकरणाचा उपयोग करावा, विद्यार्थ्यासाठी समुपदेशन सत्रे- मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती यावर भर देणारी समुपदेशनसत्रे घ्यावीत, नशा मुक्त भारत अभियानातील सहभाग भारत सरकारने दिनांक १२ऑगस्ट २०२४ रोजी नशा मुक्त भारत अभियानाचा पाचवा वर्धापन दिन साजरा केला आहे. त्या निमित्ताने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुढील गोष्टी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. (NMBA) अंतर्गत सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनी प्रतिज्ञा घ्यावी आणि (NMBA) पोर्टलवर नोंदणी करावी तसेच (NMBA) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाचा समावेश जसे की अमली पदार्थ विषय जनजागृती मोहीम, कार्यशाळा आणि विविध उपक्रम.
नशा मुक्त भारत अभियानांतर्गत नवचेतना है प्रशिक्षण मॉडेल विकसित करण्यात आले आहे. ज्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना या विषयावर संवेदनशील करण्यास मदत होईल. सर्व उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आपल्या तालुक्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा तपशीलवार अहवाल फोटोसह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे https://drive.google.com/drive/folders/11c04v9uXvtub1Qx4jJYNbzeztgXmQNCQ?usp=dri ve_link या गुगल लिंकवर दरमहा सादर करण्यात यावा. जेणेकरून तुमच्या मार्फत आलेला अहवाल राज्यावर सादर करणे शक्य होईल.विविध विषयाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना आदेशित करावे पालक, शालेय व्यवस्थापन समिती यांना अवगत करावे.असे आदेश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, अमरावती,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, अमरावती,प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती यांनी दिले आहे.संध्दा परीक्षा सुरु होत आहे.निपृन सारखा उपक्रम सुरु आहे.नविन प्रवेश साठी शिक्षकांना पालक भेटी,सभा घ्याव्या लागतात.अश्या शालेय शिक्षण सोडून अश्या प्रकारच्या उपक्रमामुळे शिक्षक,मुख्याध्यापक कंटाळे आहे.अश्या फालतु उपक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची पटसंख्या घसरत आहे.अश्या उपक्रमाला शिक्षकांनी बहीष्कार टाकले पाहीजे.