• Total Visitor ( 587278 )
News photo

कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघात प्रकरण; ट्रकची तांत्रिक तपासणी सुरू

Raju Tapal publisher June 02, 2026 57

कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघात प्रकरण; ट्रकची तांत्रिक तपासणी सुरू



कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण-मुरबाड रोडवर झालेल्या गंभीर अपघात प्रकरणात पोलिसांनी संबंधित मालवाहू ट्रकची तांत्रिक तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (RTO) विनंती केली आहे.पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी मोटार वाहन निरीक्षक,आरटीओ कल्याण यांना पाठविलेल्या पत्रानुसार,MH05GA6789 क्रमांकाच्या सिग्ना 2830 के बीएस-6 एचडी 16 बॉक्स ट्रकची सविस्तर यांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. हा अपघात 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11.30 वाजता कल्याण-मुरबाड मार्गावर घडला होता. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू, जीवितास धोका निर्माण करणे, गंभीर दुखापत तसेच बेदरकार वाहन चालविणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात सहभागी असलेला ट्रक गणेश दर्शन ट्रान्सपोर्ट कंपनीचा असून, दुसरे वाहन MH05EP1047 असल्याची नोंद आहे. पोलिसांनी वाहनाच्या ब्रेक,स्टीयरिंग,टायर,लाईट्स तसेच इतर यांत्रिक बाबींची तपासणी करून अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. या तपासणी अहवालाच्या आधारे अपघाताचे नेमके कारण,वाहनातील तांत्रिक बिघाड होता का याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. सध्या संबंधित नुकसानग्रस्त वाहन म्हारळ पोलीस चौकी येथे ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement