• Total Visitor ( 482035 )
News photo

अमेरिकेत दहशतवादी हल्ला

Raju tapal May 22, 2025 100

अमेरिकेत दहशतवादी हल्ला; 

इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांवर गोळीबार;घटनेने खळबळ 



वॉशिंग्टन :- अमेरिकेतील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल ज्यू म्युझियमजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे.या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.सध्या पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे.अमेरिकेत वाढत्या इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे,ज्यामुळे ज्यू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.



कॅपिटल ज्यू म्युझियमजवळ वॉशिंग्टन डीसीमधील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्याचे होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी सांगितलं. जवळजवळ एक वर्षापासून सुरु असलेल्या पॅलेस्टिनी समर्थकांचं निदर्शन आणि इस्रायलविरोधानंतर अमेरिकेत अशी ही पहिलीच घटना घडली आहे.सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की,पॅलेस्टिनी कैफिया घालून एक संशयित संग्रहालयात येताना दिसला आहे.



वॉशिंग्टन डीसीमधील ज्यू संग्रहालयाजवळ आज रात्री दोन इस्रायली दूतावास कर्मचाऱ्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली.आम्ही तपास करत आहोत आणि अधिक माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत,असे नोएमने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.इस्रायली राजदूत या घटनेत सहभागी नव्हते आणि गोळीबाराच्या घटनेवेळी ते घटनास्थळी नव्हते,असं इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्याने सीएनएनला सांगितलं.अमेरिकेचे अँटर्नी जनरल पाम बोंडी यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितलं की,ते आणि डीसीच्या कार्यवाहक अमेरिकन अँटर्नी जीनिन पिरो कॅपिटल ज्यूइश म्युझियमच्या बाहेर झालेल्या गोळीबाराच्या ठिकाणी पोहोचले आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement