• Total Visitor ( 701629 )
News photo

ठाकरे बंधु एकत्र; देवरुखात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जल्लोष 

Raju tapal July 05, 2025 116

ठाकरे बंधु एकत्र;

देवरुखात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जल्लोष 



फटाक्यांची आतषबाजी करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आनंद साजरा 



देवरूख :- मराठीच्या मुद्द्यावर आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले. वरळीच्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू मंचावर एकत्र आले.ठाकरे बंधू एकत्र आल्याने देवरूखात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष



माजी राज्यमंत्री रविंद्र माने,ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर,मनसेचे तालुकाध्यक्ष अनुराग कोचीरकर,प्रद्युम्न माने,सागर संसारे, ऋतुराज देवरूखकर, अक्षय झेपले, संदीप धावडे, सचिन शिंदे, भाऊ शिंदे, पांचू चव्हाण आदिंसह अन्य कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026