श्री संताजी सहाय्यक संघ ठाणे या संस्थेचे वार्षिक अधिवेशन संपन्न
ठाणे :- श्री संताजी सहाय्यक संघ ठाणे या संस्थेचे वार्षिक अधिवेशन नुकतेच ठाणे येथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत पार पडले. गेली चाळीस वर्षे ही संस्था ठाण्यात कार्यरत असून तेली समाजाच्या उत्कर्षासाठी काम करीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या या वार्षिक अधिवेशनात प्रथम श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्य सचिव सुनील चौधरी,नगरसेविका मालती पाटील,कोमसाप ठाणे जिल्हा अध्यक्ष कवी बाळ कांदळकर,विद्यमान अध्यक्ष जयवंत रसाळ,अधिवेशनाचे अध्यक्ष गणेश राऊत,सचिव सुजितकुमार रसाळ,ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. सुनील चौधरी यांनी आपल्या भाषणात संस्थेचे कामकाज करण्यासाठी सुसज्ज कार्यालयासाठी आपण प्रयत्न करत आहेत असे सांगून समाजातील तरुणाईने आता पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन केले. नगरसेविका मालती पाटील यांनी आपण संस्थेच्या हितासाठी पुर्ण मदत करत राहणार असे आश्वासन दिले तर कवी बाळ कांदळकर यांनी अशा कार्यक्रमामुळे समाजस्वास्थ चांगले रहाते, एकोपा वाढीस लागतो आणि आज त्याची गरज आहे असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंत रसाळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन यापुढे सुध्दा असेच सामाजिक उपक्रम राबविले जातील असे सांगितले. सदर सोहळ्यात रशिया येथे विशेष प्राविण्य मिळविलेल्या मंजिरी प्रभाकर राऊत हिचा विशेष सत्कार करण्यात आला. 10 वी च्या परिक्षेत कनिष्का रहाटे 98टक्के,आर्या राऊत 95 टक्के,कृपा नादकर सीबीएसई बोर्ड 94टक्के,पुष्पराज राऊत 93टक्के,आहन रहाटे 93टक्के अशा अनेक विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करुन भेटवस्तू देण्यात आल्या. संस्थेच्या वतीने मानसी उमेश महाडिक यांनी या कामी पुढाकार घेतला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश महाडिक यांनी केले. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.