• Total Visitor ( 702181 )
News photo

टिटवाळ्यातील वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला 

Raju tapal January 05, 2026 112

टिटवाळ्यातील वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला 

राजू टपाल. 

टिटवाळा :- टिटवाळा वंचित बहुजन आघाडीच्या पॅनल क्रमांक ३ मधील उमेदवारांनी रविवारी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा करून प्रचार रैली देखील काढली. वंचित बहुजन आघाडीकडून पॅनल क्रमांक ३ मध्ये गॅस सिलेंडर चिन्हावर भावेश अरुण जाधव,शशिकांत गणेश जाधव,किरण ज्ञानेश्वर घुटे हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी आज टिटवाळा येथील करुणा बुद्ध विहारात जाऊन बुद्ध पूजा व महामानवाला अभिवादन करून जाहीर वाचन नाम्याचे उदघाटन केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे निलेश भाई जाधव प्रतिष्ठान,भारतीय बौद्ध महासभेच्या महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा शिलाताई तायडे,प्रमोद जाधव,रतन जाधव,कल्याण तालुका अध्यक्ष सुभाष पंडित,वंचितचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष किशोर जाधव,राजेश ओव्हाळ,सुनिता राजगुरु,बळवंत कांबळे,गणेश जाधव,भारत जाधव,एकनाथ उबाळे इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी जकात नाका,साईबाबा मंदिर,उमिया कॉम्प्लेक्स,गणपती मंदिर चौक,गांवदेवी मंदिर,शितला देवी मंदिर,जाललुद्दीन पिर,तरे आळी,कान्होबा मंदिर,वाणी आळी,विठ्ठल मंदिर,सोनार आळी,दत्त मंदिर,महात्मा फुले चौक,हनुमान मंदिर,बुऱ्हाणशह पीर,गणेश वाडी,शंकेश्वर सोसायटी इत्यादी परिसरातून प्रचार रैली काढली. सदर रॅली मध्ये शेकडो महिला पुरुष नागरिक उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026