• Total Visitor ( 430579 )
News photo

न्हावरे  गावच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह 

Raju tapal November 19, 2025 84

न्हावरे  गावच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह 

शिरूर...

शिरूर तालुक्यातील न्हावरे गावच्या हद्दीत अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

नवनाथ बापू कांगुणे वय -३५ रा‌.न्हावरे ता.शिरूर यांनी याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली.

दि.१७/११/२०२५ रोजी साडेनऊ वाजण्याच्या पूर्वी न्हावरे ग्रामपंचायत कार्यालयाचे समोरील आनंदराम  आचार्य व्यापारी संकुल बिल्डिंगचे जिन्याच्या समोर एक पुरूष जातीचा इसम वय अंदाजे ७५ ते ७९ वयाचा,अंगात फुल बाह्याचा शर्ट ,आतमध्ये पांढ-या रंगाची कोपरी,खाली धोतर घातलेला अनोळखी इसम हा बेशुद्धावस्थेत पडलेला असताना मिळून आला.त्यास उपचाराकरिता न्हावरे ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. अनोळखी मयत इसमाचे वारस अगर कोणी ओळखणारे आहेत काय ? याबाबत कोणाला माहिती असल्यास ०२१३८/२२२१३९ शिरूर पोलीस स्टेशन ,९८६०८४४२४३ सागर शेळके पोलीस उपनिरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement