• Total Visitor ( 704411 )
News photo

स्मृतीशेष शेवंताबाई नाना टपाल यांचा प्रथम स्मृती दिन संपन्न

Raju tapal March 05, 2026 81

स्मृतीशेष शेवंताबाई नाना टपाल यांचा प्रथम स्मृती दिन संपन्न



टिटवाळा :- टिटवाळा न्युज चे संपादक व जेष्ठ पत्रकार राजू टपाल व अशोक टपाल यांच्या मातोश्री शेवंताबाई नाना टपाल यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन मांडा पश्चिम येथील बौद्ध विहार येथे करण्यात आले होते. प्रथम महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन व स्मृतीशेष शेवंताबाई नाना टपाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धचार्य रामचंद्र पवार गुरुजी यांनी बौध्द संस्कार विधीचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर शोकसभा कार्यक्रम घेण्यात आला. रिपाइंचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यावेळी नगरसेवक बंदेश जाधव,भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा शिलाताई तायडे,संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष प्रभाकर भोईर,अँड. जितेंद्र जोशी,रिपाइंचे युवक अध्यक्ष सन्नी जाधव,पत्रकार चंद्रकांत भोईर,सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे,अमोल केदार,उद्योगपती मोहन जाधव,रमेश गायकवाड,अरूण साळवे यांच्या सह टपाल कुटुंब उपस्थित होते.

तसेच यावेळी स्मूतीशेष शेवंताबाई नाना टपाल यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ भारतीय बौद्ध महासभेची दिनदर्शिका  उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विलास भोईर यांनी केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026