• Total Visitor ( 133893 )

निर्दयी मातेने पोटच्या दोन चिमुकल्यांचा साखरझोपेत गळा आवळला

Raju tapal February 08, 2025 26

निर्दयी मातेने पोटच्या दोन चिमुकल्यांचा साखरझोपेत गळा आवळला; 
जिने जन्म दिला तिनेच चिमुकल्यांना संपवलं;
पतीवरही कोयत्याने केले वार;
पुणे हादरलं 

पुणे :- घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. कोमल दुर्योधन मिंढे (वय, 30)  असे या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.

शंभू दुर्योधन मिढे (वय ०१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ०३ वर्ष) अशी मयत मुलांची नावं आहेत. तर, दुर्योधन आबासाहेब मिढे (वय 35 वर्ष) असं जखमी पतीचं नाव आहे. शनिनारी पहाटेच्या सुमारास शंभू आणि पियू ही दोन्ही चिमुरडी पोरं झोपलेली होती. यादरम्यान मुलं साखर झोपेत असतानाच कोमलने त्यांचा जीव घेतला.

ज्या पोरांना तिने जन्माला घातलं, आपल्या हातांनी त्यांनी वाढवलं त्याच हातांनी गळा आवळून तिने दोन्ही पोरांची हत्या केली. ती इतक्यावरच थांबली नाही तर त्यानंतर तिने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले. तिने पतीच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला कंटाळून कोमलने हे भयंकर पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement