टिटवाळ्यातील इंदिरानगर स्मशानभूमीची दयनीय अवस्था
प्रेत ठेवण्यासाठीचे लोखंड गायब,मेनगेट ही चोरीला
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळ्यातील इंदिरानगर येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून येथे अंत्यसंस्कारासाठी येत असलेल्या प्रेतांना अग्निडाव देण्यासाठी खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील प्रेतांना जाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या ह्या चोरीला गेल्या असल्याने प्रेत ठेवण्यासाठी लाकडाचा वापर करावा लागत आहे. सदरील स्मशानभूमीच्या लोखंडी जाळ्यांची चोरीची घटना ही दुसऱ्यांदा घडलेली आहे. तसेच स्मशानभूमीचे असलेले लोखंडी गेटही चोरांनी लंपास केले आहे. सदरील चोरीच्या घटना ह्या परिसरातील गर्दुल्ल्याकडून केल्या जात असल्याचे ठाम मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले . तरी केडीएमसी प्रशासनाने सदरील स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्या बरोबरच पोलीस प्रशासनाने या परिसरात रात्रीची गस्त वाढूवून कायदा व सुव्यस्था आबाधीत ठेवण्या बरोबरच परिसरात होण्याऱ्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावावा अशी मागणी संघर्ष रहिवाशी संघटनेचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ रवी शेजूळ यांनीही केली आहे.