• Total Visitor ( 700893 )
News photo

निर्वी येथे कृषीपंप,पाईपची चोरी

Raju tapal January 11, 2026 67

निर्वी येथे कृषीपंप,पाईपची चोरी

     

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील निर्वी‌ येथील शेतक-याच्या विहीरीतून पाणबुडी विद्यूतपंप,पाईप चोरीस जाण्याची घटना घडली आहे. सुभाष बापूराव सोनवणे रा‌.निर्वी,सध्या रा‌.शाहूनगर चिंचवड यांनी याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बुधवारी दि.७ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा वाटेकरी शेतातील पिकांना पाणी देवून विद्यूतपंप बंद करून घरी परतला होता.पुन्हा पाणी देण्यासाठी गेल्यानंतर विद्यूतपंपाला जोडलेला काळा पाईप कापलेला तसेच वायर तुटलेली त्यांना आढळून आली.

शुक्रवारी दि.९ जानेवारीला सोनवणे यांनी शेतात जावून पाहणी केली असता विहीरीत बसविलेली नवीन निळ्या रंगाची टेक्स्मो कंपनीची ५ अश्वशक्तीची पाणबुडी मोटर,तिला जोडलेला ३५ फूट लांबीचा ४ इंची काळा पाईप चोरीस गेल्याचे त्यांना दिसून आले. पोलीस हवालदार मोरे चोरीच्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026