• Total Visitor ( 481720 )
News photo

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणा-या चोरट्याला अटक

Raju tapal June 12, 2025 93

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणा-या चोरट्याला अटक ; स्थानिक गुन्हे शाखा, रांजणगाव एम आय डी सी पोलिसांची कामगिरी 

        

शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- दुकानात जावून पाण्याची बाटली घेण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावणा-या चोरट्याला अटक करून स्थानिक गुन्हे शाखा,रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी १० लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मारूती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे रा.लिंबोडी ता‌.आष्टी जि.बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार शरद बापू पवार रा‌.लोणी सय्यद ता‌.आष्टी जि‌.बीड हा फरार आहे.

या आरोपीकडून रांजणगाव, शिक्रापूर, शिरूर,आळंदी,चाकण, पिंपरी चिंचवड,कर्जत, अहिल्या नगर येथील ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पिंपरी दुमाला येथील धनगरवाडा स्नॅक्स सेंटरमध्ये २५ मार्च २०२५ रोजी वंदना रोहिदास शेटे वय -३३ यांच्याकडून एका अनोळखी व्यक्तीने पाण्याची बाटली मागून त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला होता. त्यांचा साथीदार स्पोर्ट्स बाईकवर दुकानाबाहेर थांबला होता.

वंदना शेटे यांनी या घटनेबाबत रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे,कुलदीप संकपाळ,पोलीस हवालदार तुषार पंदारे‌, जनार्दन शेळके,राजू मोमीन,संजू जाधव,उमेश कुतवळ यांनी चोरट्याला अटक करण्याची ही कामगिरी केली.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे कोंढापुरी ( शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement