• Total Visitor ( 481783 )
News photo

टिटवाळ्यातील इंदिरानगर मधील मैना मोबाईल चे दुकान चोरट्यानी फोडले

Raju tapal May 19, 2025 94

टिटवाळ्यातील इंदिरानगर मधील मैना मोबाईल चे दुकान चोरट्यानी फोडले



दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याची माहिती



राजू टपाल.

टिटवाळा :- टिटवाळा मधील इंदिरानगर परिसरातील स्मशानभूमी जवळील रस्त्यावर असलेले इंदल कुशवाहा यांच्या मालकीचे मैना मोबाईल हे दुकान रविवारी रात्री अडीच च्या सुमारास फोडले. चोरट्यानी दुकानाच्या छतावर असलेले सिमेंट पत्रे फोडून तसेच त्याखाली असलेले पिओपी तोडून दुकानात प्रवेश केला.

चोरट्यानी दुकानातील एमआय नोट फोर मोबाईल,डेटा केबल चे आठ पिस,5 एअरबडस,चार्जिंग केबल चे 12 पिस,छोटे स्पीकर 6 पिस, मोबाईल चार्जिंगचे 41 पिस, नेकबँड चे 5 पिस,एअर फोन चे 6 पिस,चार्जर चे 27 पिस इत्यादी चोरून नेले. त्यावेळी परिसरात राहणारे मनोज कांबळे हा इसम उठून त्याने आरडाओरडा केल्याने चोरट्यानी धूम ठोकली. या चोरीच्या प्रकरणी  परिसरातील दुकानदारामध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement