• Total Visitor ( 133270 )

मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी

Raju tapal February 28, 2025 27

मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी !
पाकिस्तानी क्रमांकावरुन धमकीचा मेसेज !

मुंबई :- मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना मिळाला आहे. व्हॉट्सॲपवर हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी वरळी पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा मेसेज आला होता, त्यानंतर पोलिस यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले, अशी माहिती समोर आली आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement