• Total Visitor ( 426628 )
News photo

'जनगणना 2027' साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण

Raju tapal March 11, 2026 11

'जनगणना 2027' साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण



      अमरावती :- आगामी 'जनगणना 2027' च्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध स्तरावरील जनगणना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दि. 16 ते 18 मार्च या कालावधीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण हे दि. 16 ते 18 मार्च या तीन दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. प्रशिक्षणात जिल्हा जनगणना अधिकारी,सर्व चार्ज जनगणना अधिकारी,शहर जनगणना अधिकारी, अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी,जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक सहभागी होणार आहेत. कार्यशाळेत जनगणनेच्या कामात प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची नेमकी कर्तव्यांची माहिती दिली जाणार आहे. घरांची यादी तयार करणे,घरांची गणना करणे आणि सीएमएमएस आणि एचएलबीसी पोर्टलचा वापर करण्याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुख्य जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडणार आहे. प्रशिक्षणाला जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचारी यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement