• Total Visitor ( 435176 )
News photo

अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबियांवर काळाची झडप

Raju tapal May 19, 2025 93

अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबियांवर काळाची झडप



इर्टिगा कार जगबुडी नदीपात्रात कोसळली,



पाच जणांचा अंत



आज सोमवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडला अपघात



खेड :- देवरुख येथे अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबियांवरच काळाने झडप घातली. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात इर्टिगा कार कोसळून पाच जणांचा अंत झाला. चालकासह अन्य एक सुदैवाने बचावला आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर ( सर्व रा. मिरा रोड -मुंबई ) अशी मृतांची नावे आहेत.



हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णतः चुराडा होऊन प्रवासी आतमध्येच अडकले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. सोमवारी पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement