• Total Visitor ( 449638 )
News photo

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा पोलिसांची आढावा बैठक संपन्न

Raju tapal December 28, 2025 86

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा पोलिसांची आढावा बैठक संपन्न

राजू टपाल. 

टिटवाळा:-  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी पार पडत आहे. सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन तसेच होणाऱ्या निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवारी समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकी करिता उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभागाचे अनिल लाड हे उपस्थित होते. तसेच मांडा,टिटवाळा,बल्याणी,उंभरणी इत्यादी पॅनल क्रमांक ३ व पॅनल क्रमांक ४ मध्ये येत असलेल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते. मुक्त व पारदर्शक मतदान प्रक्रिया ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचा संदेश या बैठकीत दिला गेला. निवडणुकीच्या काळात  सोशल मीडियावर होणाऱ्या अपप्रचार व दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर बारीक नजर ठेवली जाणार असून त्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट सांगण्यात आले. तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड तसेच पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या तर्फे आवाहन करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement