• Total Visitor ( 84686 )

टिटवाळ्यात प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

Raju Tapal November 07, 2021 38

टिटवाळ्यात प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

टिटवाळा गणपती मंदिर जकात नाका परिसरातील एसजीपी ग्रुप ने श्री गणेश पार्क,जुना जकात नाका गोवेली रोड येथे किल्ला साकारला असून गेल्या पाच वर्षांपासून ची ही त्यांची परंपरा आहे. ते साकारत असलेल्या किल्यामुळे त्यांच्या सोसायटीचे नाव झालेले असल्याचे तेथील बाळ गोपाळ गर्वाने सांगतात. त्यांना हा प्रतापगड किल्ला बनवण्यासाठी माती,दगड,गोण्या,हिरवळी सठी राइ यांचा वापर केला. किल्ल्याचा पाया भरण्यासाठी गोन्यानमध्ये आम्ही माती टाकून किल्ल्याचा आकारात ठेवल्या वरून माती टाकली, बाजूला डोंगर बनवण्यासाठी मातीचा वापर केला , किल्ल्याच्या कडा बनवण्यासाठी त्यांनी भाताच्या शेतातली माती वापरली , हिरवळ दिसावी म्हणून राई व रांगोळी वापरली.
15 ते 24 वयोगटातील मुलांनी सदरील किल्ला 15 दिवसांत बनवला. या मध्ये प्रामुख्याने
सौरभ हाक्के,भावेश पंडित
हेमंत पंडित,मयूर संतोषी
चिराग गायकवाड,धनराज 
परदेशी,जय साहू
नारायण साहू,आयुष शर्मा
पियुष गायकवाड ,निलेश परबत,विवेक तिवारी इत्यादीचा सहभाग आहे.
सदरील किल्ला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Share This

titwala-news

Advertisement