उत्तमसरा येथे अॅनेमिया मुक्त गाव या उपक्रमा अंर्तगत प्रशिक्षण संपन्न
प्रमोद शिंदे, प्रशिक्षक, यशदा, पुणे यांचे मार्गदर्शन
महिला बाल स्नेही ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यातून उत्तमसराची निवड
ग्रामपंचायतला ५ लाखाचे बक्षिस
भातकुली/अमरावती दि.२६ :- ग्रामपंचायत उत्तमसरा ता. भातकुली जिल्हा अमरावती येथे ऍनिमिया मुक्त गाव प्रशिक्षण घेण्यात आले सदर प्रशिक्षणास विस्तार अधिकारी आरोग्य उमेद तालुका व्यवस्थापक सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व बचत गट प्रेरिका अंगणवाडी सेविका v सर्व गावातील कर्मचारी उपस्थित होते प्रशिक्षक म्हणून प्रमोद शिंदे,प्रशिक्षक यशदा पुणे यांनी मार्गदर्शन केले सोबत सरपंच हनवतखेडा तायडे मॅडम व गुल्हाने सर अतिश सर उपस्थित होते.
ग्रामपंचायत उत्तमसरा ता. भातकुली जि. अमरावती या गावाची निवड महिला व बाल स्नेही ग्रामपंचायत म्हणुन अमरावती जिल्हयातुन करण्यात आलेली असल्यामुळे सदर उपक्रमाअंर्तगत उत्तमसरा या गावाची निवड अॅनेमिया मुक्त गाव सन २०२५ करीता राज्यशासनामार्फत करण्यात आलेली आहे. सदर उपक्रमाअंर्तगत घ्यावयाचे बाबी तसेच करावयाचे नियोजन याबाबत ग्रामपंचायत स्तरावर सर्व संबधिताचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. दिनांक २५/०५/२०२५ रोजी रविवारला ठीक सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, उत्तमसरा ता. भातकुली येथे आयोजित प्रशिक्षणा करीता उपस्थित होते.या ग्रामपंचायतला शासनाचे ५ लाखाचे बक्षिस घोषित झाले आहे.
या प्रशिक्षणास धर्मेंद्र मधुकरराव मेहरे, सरपंच ग्रामपंचायत उत्तमसरा, संगिता गणेशराव मानकर, उपसरपंच ग्रामपंचायत उत्तमसरा,ग्रामसेवक आशिष अंबाडकर,ज्ञानेश्वर रामदास मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य, किर्ती देवानंद मेश्राम, ग्रामपंचायत सदस्या, अपर्णा शरदराव झाडे, ग्रामपंचायत सदस्या, मनिषा दिपकराव शेवतकर, ग्रामपंचायत सदस्या, वनिता भाष्कर शेवतकर, ग्रामपंचायत सदस्या, नितीन यशवंतराव राऊत, ग्रामपंचायत सदस्य,दिलीप हरीभाऊ व-हेकर, ग्रामपंचायत सदस्य, सुधीर मंडवे, विस्तार अधिकारी (आरोग्य) पंचायत समिती भातकुली, भुषण देशमुख, तालुका समन्वयक, उमेद (NRLM) पंचायत समिती भातकुली, सोनाली देशमुख, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,उत्तमसरा, अमित नससिंगकर, आरोग्यसेवक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उत्तमसरा हिरेकर, आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उत्तमसरा
मंगला वानखडे, आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उत्तमसरा, मिनाक्षी इंगळे, मुख्याध्यापक, जि.प.शाळा (प्राथमिक) उत्तमसरा,
लोमेश खैरकर, मुख्याध्यापक,जि.प.शाळा (माध्यमिक) उत्तमसरा, मुक्ता कांबे, बचत गट प्रर्वतिका,उत्तमसरा, दिपाली मेहरे, बचत गट प्रर्वतिका, उत्तमसरा, प्रणोती मेहरे, अध्यक्षा, एकता ग्रामसंघ,उत्तमसरा, विना दहीकर, सचिव, एकता ग्रामसंघ,उत्तमसरा, योगिता सवाई, अध्यक्षा संघर्ष ग्रामसंघ,उत्तमसरा, आरती सवाई, सचिव संघर्ष ग्रामसंघ, भिंगारे, अंगणवाडी सेविका, उत्तमसरा, जयश्री पेढेकर,अंगणवाडी सेविका, उत्तमसरा, रुपाली बेलसरे,अंगणवाडी मदतनिस, वर्षा मानकर, अंगणवाडी मदतनिस, सुरेखा सवाई, आशा स्वयंसेविका, संगिता निंभोरकर, आशा स्वयंसेविकासह अमित पेढेकर शिपाई,शुभम अवचार पाणी पुरवठा कर्मचारी,अरविंद मावंदे सफाई कामगार,पल्लवी राऊत संगणक परिचालक उपस्थित होते.