• Total Visitor ( 576668 )
News photo

शिरूर तालुक्यातील करडे येथे वृक्षारोपण 

Raju Tapal publisher June 08, 2026 48

शिरूर तालुक्यातील करडे येथे वृक्षारोपण 

       

“एक कुटुंब-एक झाड” संदेशातून पर्यावरण जनजागृती

   

शिरूर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करडे ता.शिरूर जि.पुणे येथील हरेकृष्ण  गोशाळा मध्ये गोमातेची पूजन करून परिसरात माहिती सेवा समिती शिरूर तालुका व उद्योजक शुभम दत्तात्रय शेवाळे यांच्या तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात सुमारे ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमास न्हावरे-शिरूर गटाच्या पुणे जिल्हा परिषद सदस्या वृषालीताई वाळके,ग्रामसेवक बाळासाहेब बेंद्रे,सरपंच सुनील इसवे,शरद टेमगिरे लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) लेबर सेल,महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष शरदराव टेमगिरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच स्वप्निल शेवाळे,निखिल शेवाळे,विराज शेवाळे,स्वप्नील वेताळ,प्रवीण देवकर,यश तळेकर,महेश दुंडे,गणेश व्यवहारे,अविनाश उबाळे,दर्शन टेमगिरे,विवेक नरवडे व मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हिरवे भविष्य निर्माण करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी बोलताना उद्योजक  शुभम शेवाळे यांनी “आपल्याला १०० किंवा १००० झाडे लावण्याची गरज नाही, तर प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लावून ते जगवावे. वृक्षारोपणाबरोबरच त्याचे संगोपन व ऋसंवर्धन करणेही तितकेच आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ,सहकारी व मित्र परिवार यांचे आभार मानण्यात आले.      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement