हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना गुजर प्रशालेच्या वतीने अभिवादन
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन करण्यात आले.
ऑगस्ट क्रांतिदिनाच्या दिवशी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या देशभक्तांचे स्मरण केले जाते. तळेगाव ढमढेरेचे सुपुत्र हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे.
त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेतील मुलांनी बँडपथकाच्या तालावर त्यांना मानवंदना दिली असे मुख्याध्यापक अशोक दहिफळे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ ढमढेरे यांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी ऑगस्ट क्रांती दिनाची माहिती सांगितली.
प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे..रुपाली ढमढेरे, अविनाश कुंभार, चंद्रशेखर सातपुते, राजेंद्र भगत, दत्तात्रय नरके हे उपस्थित होते.