उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकींची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
शिक्रापूर :- दुभाजकावरून वळण्यासाठी थांबलेल्या कंटेनरला दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोरतापवाडी येथील वाकडा पुलावर बुधवारी दि.७ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
स्वप्नील सुनील म्हस्के वय - २३ रा.डाळींब ता.दौंड जि.पुणे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे आहे.
स्वप्निल म्हस्के पुण्यावरून उशिरा उरूळीकांचनकडे निघाले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी हद्दीतील वाकडा पुलावर आले असता दुभाजकावरून वळण्यासाठी थांबलेल्या कंटेनरला स्वप्निल म्हस्के यांच्या दुचाकीची नियंत्रण सुटल्याने पाठीमागून धडक बसली.स्वप्निलच्या अंगाला जबर दुखापत झाल्याने अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.पोलीस शिपाई अश्वजीत मोहोड यांनी या अपघाताची तक्रार उरूळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये दिली.
पोलीस हवालदार उद्धव गायकवाड या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर)