• Total Visitor ( 471971 )
News photo

सराईत दुचाकी चोर जेरबंद 

Raju Tapal publisher April 08, 2026 23

सराईत दुचाकी चोर जेरबंद 

  

पुणे :- सराईत दुचाकी चोराला स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे.

राहूल अशोक दाते वय -२५ रा‌.मंचर असे दुचाकी चोराचे नाव असून चार दुचाकी,एक मोबाईल असा एकूण १ लाख ११ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी आरोपीकडून जप्त केला आहे. मंचर,घोडेगाव,नारायणगाव,ओतूर परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने तपास पथकाने घटनास्थळांवरील‌ सी सी टी व्ही फुटेज तपासले असता सर्वं चोरीच्या ठिकाणी एकच व्यक्ती दिसत असल्याने एकच व्यक्ती संशयास्पद रित्या वावरताना दिसून आली. गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अक्षय नवले यांना सी सी टी व्ही तील चोरटा राहूल दाते असल्याची माहिती मिळाली.तो चोरीच्या गाड्या नारोडी फाटा येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement