• Total Visitor ( 429468 )
News photo

मांडा पश्चिमेतील अनधिकृत 7 खोल्या व 123 जोते जमीनदोस्त

Raju tapal February 12, 2025 154

मांडा पश्चिमेतील अनधिकृत 7 खोल्या व 123 जोते जमीनदोस्त



मांडा पश्चिम येथील सांगोडा रोडवरील स्मशानभूमी लगत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये ७ पूर्ण अवस्थेत असलेल्या खोलीचे वीट बांधकाम व जवळजवळ 123 दगडी जोत्यांचे (फाउंडेशन), सिमेंट काँक्रीटचे फाउंडेशन  तोडण्यात आलेले आहेत.   

अजूनही प्रभागातील चालू बांधकामांचा शोध घेऊन नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे

कारवाई साठी अतिक्रमण विभागाचे ४ पोलीस कर्मचारी, ठेकेदाराचे ५ कामगार एक जेसीबी. अतिक्रमण विभाग वरिष्ठ लिपिक, लिपिक आणि पथकातील आठ कामगार यांचे सहाय्याने  निष्कासन केले आहे. अशी माहिती प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त १/अ प्रभाग यांनी टिटवाळा न्यूज ला दिली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement