रामजन्म उत्सवानिमित्त आळंदीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिक्रापूर :- आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट राम मंदिर आळंदी देवाची या ठिकाणी गुरुवार १९ मार्च २०२६ ते गुरुवार २६ मार्च २०२६ या कालावधीमध्ये राम मंदिरात संगीत,नृत्य,भजन नारदीय कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रोज सकाळी ७ ते ८ या वेळात वेद पाठशाला आळंदी यांच्यामार्फत रुद्र अभिषेकाचे मंत्र पठण केले जात आहे.त्याच बरोबर १९ तारखेपासून भरतनाट्यम परिमल फडके परिमल परफॉर्मिंग आर्ट अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सादर केला.शब्दविणे संवादू भक्ती पूर्व वाद्य संगीत पंडित रमाकांत पराजपे,अभंग वाणी व भावगीत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई रोकडे महाराज,राम कृष्णजी गरड महाराज,मुक्ता कुलकर्णी गरसोळ,रामलीला सई देशपांडे,गजर रामनामाचा नितीन आवेकर,सेक्सोफोन वादन संजय भावे,संतांचिया गावा राग संगीत अभंग अर्पणा केळकर,भक्ती संगीत भज मन राम अमिता घुगरी व तुषार रिठे,भजन राम पर्व ऐक ध्यास हेमंत आठवले,बासरी वादन अमित खरे. अभंग व भक्तीगीत ज्योती गोराणे,वारकरी भजन ह. भ.प. आबा महाराज गोडसे,शास्त्रीय वायलिन वादन विद्या इंगळे व रमा चोभे हे कार्यक्रम आतापर्यंत राम मंदिरामध्ये संपन्न झाले आहेत. आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल आवेकर व विश्वस्त अविनाश गुळुंजकर अर्जुन मेदनकर,लक्ष्मीकांत दंडनाईक,चिन्मय चोभे,रमेश मुसुडगे व सर्व माजी विश्वस्त यांच्या वतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला पुढील कार्यक्रम राम नवमीपर्यंत राम मंदिरामध्ये होणार असून सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.