• Total Visitor ( 449556 )
News photo

निमगाव म्हाळुंगी विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न        

Raju tapal September 04, 2025 95

निमगाव म्हाळुंगी विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न        



शिक्रापूर गणेशोत्सव तसेच राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या विविध क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या.

इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या क्रिडा स्पर्धा दि.२८ तसेच २९ आॅगस्ट २०२५ असे दोन दिवस पार पडल्या.

दि.२८ आॅगस्ट रोजी कबड्डी स्पर्धेने स्पर्धांची सुरूवात करण्यात आली.

इयत्ता ५ वी अ‌ विरूद्ध ५ वी ब झालेल्या कबड्डी स्पर्धेत ५ वी अ मुले,मुली या संघाने ५ वी ब संघावर विजय मिळविला.

प्रा.रमेश घावटे, प्रा.सौ.बेबी चव्हाण, मॅजिक बस इंडिया या संस्थेचे प्रा.गणेश पवार यांनी या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले.

इयत्ता ६ वी अ विरूद्ध इयत्ता ६ वी ब या संघांमध्ये झालेल्या कबड्डी स्पर्धेत इयत्ता ६ वी अ संघाने मुले,मुली दोन्ही गटांत विजय संपादन केला.

प्रा.प्रकाश धोत्रे,प्रा.आकांक्षा थोरात,प्रा.गणेश पवार यांनी या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिले.

दि.२८ आॅगस्ट रोजी विद्यालयातील स्पर्धेची सुरुवात कबड्डी स्पर्धांनी झाली.इयत्ता ५ वी ते १० वी साखळी पद्धतीने अ तुकडी  विरूद्ध ब तुकडी विद्यार्थी संघांनी स्पर्धेला जल्लोषात सुरूवात केली. दोन विजयी संघांचे पुन्हा कबड्डी सामने झाले.इयत्ता ७ वी ब संघाने इयत्ता ९ वी ब संघावर विजय मिळविला. इयत्ता ७ वी अ मुलींच्या संघाने इयत्ता ७ वी ब, इयत्ता ९ वी ब या स़ंघांना पराभूत केले.

प्रा अमोल म्हस्के,प्रा.कोमल शिंदे,प्रा.महेश शेलार,प्रा.बेबी चव्हाण,प्रा.प्रगती लांडगे यांनी पंच म्हणून काम पाहिले तसेच निकाल घोषित केले. त्यानंतर इयत्ता ८ वी अ विरूद्ध ब इयत्ता ९ वी अ विरूद्ध ब तसेच १० वी अ विरूद्ध ब झालेल्या चुरशीच्या कबड्डी सामन्यांत अ तुकडीच्या संघांनी ब तुकड्यांवर विजय मिळविला. इयत्ता १० वी अ च्या‌ संघाने साखळीतील अंतिम सामन्यात १० वी ब ला पराजित केले.

प्रा.सो.अनिता चव्हाण,प्रा.मनिषा गिरे‌,प्रा.सुप्रिया पवार यांनी या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिले. व निकाल घोषित केले.

त्यानंतर साखळी पद्धतीने पार पडलेल्या इयत्ता ७ वी ते १० वी खो -खो सामन्यांत प्रा.रमेश करपे, प्रा.धनाजी थोरात,प्रा.प्रकाश धोत्रे,यांनी पंच म्हणून काम पाहिले तसेच निकाल घोषित केले.

दि.२९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाची सुरूवात डाॅस बाॅल स्पर्धांनी झाली. इयत्ता ६ वी ते १० वीच्या संघांनी त्यामध्ये सहभागी घेतला.

प्रा.रमेश करपे, प्रा.बेबी चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले.

त्यानंतर मॅजिक बस इंडिया, विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लेग क्रिकेट,रिले रेस,पास बाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या संघांनी सहभाग घेतला.

मॅजिक इंडिया बस संस्थेचे उमेश साळवे व त्यांच्या टीमने पंच म्हणून काम पाहिले. शेवटी विद्यालयातील शिक्षकांची पास बाॅल स्पर्धा पार पडली. त्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव, पर्यवेक्षक मुकूंदराव ढोकले‌,प्रा.रमेश करपे,प्रा.बेबी चव्हाण,महेश शेलार, धनाजी थोरात,प्रकाश धोत्रे,अनिता चव्हाण,मनिषा गिरे‌,प्रगती लांडगे,सुप्रिया पवार,रणसिंग,आकांक्षा थोरात,बिराजदार,शिल्पा पवार या शिक्षकांनी सहभाग घेतला.

प्राचार्य रमेश जाधव,पर्यवेक्षक प्रा‌.मुकूंदराव ढोकले‌,मॅजिक इंडिया बस संस्थेचे प्रमुख उमेश साळवे यांच्या हस्ते प्रत्येक विजयी संघांना ट्राॅफी देवून सन्मानित करण्यात आले.



विजय ढमढेरे शिक्रापूर (प्रतिनिधी)         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement